यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ |Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ |Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

|Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana २०२४

विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकासाठी यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना.

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

प्रस्तावना

देश्याच्या स्वातंत्र्यानंतर बरीच वर्ष उलटूनही विमुक्त जाती व भटक्या जमातीचा समाज अध्यापही मुख्य प्रवाहत येऊ शकलेला नाही.या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते.आपण जर बघितले भटक्या व विमुक्त जमातीचे समुदाय नियमितपणे भ्रमंती करत असतात.ते जिथे जागा भेटेल तिथे आपली तात्पुरती छावणी उभी करून वास्तव्यास राहत असतात.भटक्या विमुक्त समाजाचे राहणीमान उंचावे, त्यांचे उत्पनाचे स्रोत वाढावे. त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून त्यांना जमीन उपलब्ध करून  तेथे वसाहती उभी करून देणे व त्याठिकाणी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे आवश्यक आहे.त्यामुळे विमुक्त जाती, भटक्या जमाती या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana हि योजना यशस्वी होऊ शकली नाही.हि बाब विचारात घेवून सदर योजनेत काही सुधारणा करून विजाभज समाजास सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त देण्याकरिता व त्यास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदर योजनेचा मूळ योजनेत सुधारणा करून सदर योजना राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेच्या धर्तीवर किंवा पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

[wptb id=817]

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपले आपल्या मराठी वेबसाईटमध्ये सहर्ष स्वागत आहे.आपण आपल्या मराठी वेबसाईटवर विविध योजना घेवून येत असतो.आमचा प्रामाणिक उद्देश एकच कि ज्या व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ हवा त्यापरेंत हि योजना पोहचली पाहिजे.केंद्रसरकार आणि राज्य सरकार यांच्या योजना आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो आज आपण अश्याच महत्वपूर्ण योजनेपैकी एक योजना बघणार आहोत.ती म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ योजनेबद्दल आपण ह्या पोस्टच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.तरी आपण हा लेख शेवटपरेंत वाचवा कारण आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाबदल काही प्रश्न किंवा शंका असतील तर ह्या पोस्टच्या माध्यमातून नक्कीच त्या शंका किंवा प्रश्नांचे निराकरण होईल अशी आशा व्यक्त करतो.

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojanaतर मित्रानो आपण जर बघितले भटक्या व विमुक्त जमातीचे समुदाय नियमितपणे भ्रमंती करत असतात.ते जिथे जागा भेटेल तिथे आपले वास्तव्य करत असतात.ह्या समुदायाचे वडिलोपार्जित करत असणारे व्यवसाय जसे कि जडीबुटी , भांडे बनवणे , लोहारी काम किंवा मेंढी पालन अश्या अनेक व्यवसाय गावोगावी फिरून हा समुदाय करत असतो त्या व्यवसायातून मिळणारे २ पैसे  त्या वर आपल्या कुटुंबांचे उधरनिर्वाह व उपजीविका भागवत असतात.पण त्या अश्या रोजच्या जीवनात अनेक समस्या येत असतात, जसे कि आरोग्य , निवारा आणि मुलांच्या शिक्षांचा प्रश्न अश्या अनेक प्रश्नाशी समायोजन करत आपले जीवन जगात असतात.आज भारताला स्वातंत्र मिळून अनेक वर्ष लोटले गेले.पण अजून हि भटक्या विमुक्त व भटक्या जमाती मुख्य प्रवाह मध्ये येऊ शकले नाही.त्यांचा मुलांना शिक्षण नाही, चांगले आरोग्य नाही यासाठी महाराष्ट्र सरकार ने निर्णय घेतला कि या समुदायला मुख्य प्रवाह मध्ये आणून त्यांना उत्पनाचा स्रोत निर्माण करून त्यांचे जीवनमान उंचवने यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana योजना राबवण्याची अमलबजावणी केली चला तर आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनासाठी Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता व अटी शर्ती आपण ह्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.

मोदी आवास घरकुल योजनेसाठी येथे क्लिक करा !

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पात्रात निकष

१.लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती, भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे असावे.

२.लाभार्थी कुटुंबाकडे जमीन नसावी.

३.लाभार्थी कुटुंबाकडे स्वतःच मालकीचे घर नसावे.

४.लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

५.लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाखां पेक्षा जास्त नसावे.

६.लाभार्थी कुटुंब हे झोपडी /कच्चे घर / पालामध्ये राहणारे असावे.

७.लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कुठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

८.लाभार्थी वर्षभरात ६ महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बाहिन योजनेसाठी येथे क्लिक करा !

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्राधन्यक्रम

या योजनेसाठी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाना खालीलप्रमाणे प्राधन्य क्रम देण्यात आला आहे.

१.पालात राहणारे (गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारा)

२.दारिद्र्य रेषेखालील कुटुंब

३.घरात कोणही कमावत नाही अश्या विधवा, परितक्त्या किंवा अपंग महिला

४.पूरग्रस्त क्षेत्र

बांधकाम कामगार योजनेसाठी येथे क्लिक करा !

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अटी व शर्ती

   १.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनामध्ये लाभार्थी कुटुंबाना मिळणारा भूखंड व त्यावरील घर  हे संयुक्तपणे पती व पत्नी यांच्या नावे केली जाईल.

२.पण विधवा व परितक्त्या स्रीयांच्या बाबतीत भूखंड व घर त्यांच्याच नवे केली जातील.

३.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाअंतर्गत लाभार्थ्यास मिळणारे घर कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीच्या नवे किंवा हस्तांतरित करता येणार नाही.आणि ह्या योजनेतून मिळणारे घर कोणत्याही परिस्थितीत कोणालाही विकत येणार नाही.

४.ह्या योजनेच्या लाभ कुटुंबातील एका सदस्याच देय राहील.

५.भूखंडावरील जागेचा वापर हा भाडे तत्वावर अन्य व्यक्ती/कुटुंबास देता येणार नाही.तसेच पोट भाडेकरू सुद्धा ठेवता येणार नाही. तसेच विकता हि येणार नाही असे आढळून आले कि सदरचा लाभ हा रद्द करण्यात येईल व मंजूर केलेल्या निधीची वसुली केली जाईल.

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा!

६.प्रस्तुत घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून आकरण्यात येणारी वार्षिक घरपट्टी व पाणीपट्टी लाभार्थ्याला भरणे आवश्यक आहे.आणि घराची देखभाल व दुरुस्ती हि लाभार्थ्याला स्वतः करायची आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ |Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनासाठी आवश्यक कागदपत्रे:

१.सक्षम प्राधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र

२.लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखां पेक्षा जास्त नसावे.

३.भूमिहीन असल्याबाबत सक्षम प्राधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र

४.महाराष्ट्र राज्यातील वास्तव्यबाबतचे अधिवास प्रमाणपत्र

५.कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबत रु-१००/- च्या स्टंप पेपरवर शपथपत्र

भूखंड व त्यावरील घराचे क्षेत्रफळ व किमत:

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana सदरहू योजना ग्रामीण भागात राबविण्यात येणार असून प्रत्येक लाभार्थी कुटुंबास शासनाने अथवा अधिकाऱ्याने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर रामी आवास योजनेच्या निकषांनुसार घर बांधून देण्यात येईल अथवा जर लाभार्थ्याची स्वतःची जागा असेल तर त्या जागेवर लाभार्थ्यास घराचे बांधकाम करता येईल.घराचा आराखडा हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास घरकुल योजनेतील घराच्या आराखड्याप्रमाणे Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana राहील.

स्वयंरोजगार निर्मिती

वसाहती मधील लाभार्थी कुटुंबाना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध व्हावी म्हणून पशुसंवर्धन, कृषी, जिल्हा उद्योग केंद्र, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध रोजगाराच्या संधि उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.शक्य असेल तर त्याठिकाणी बचत गटाची स्थापना करून त्याद्वारे देखील लाभार्थी कुटुंबाच्या उत्पनाच्या स्रोत वाढविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येईल.

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण यशवंतराव चव्हाण वसाहत योजनाबदल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला.तरीही आपले काही प्रश्न असतील तर आम्हला comment च्या माध्यमातून विचारू शकता.आम्ही लवकरात-लवकर आपल्या प्रश्न असो किंवा शंका याचा निराकरण करण्याचा प्रयन्त करू.मित्रानो योजना जास्तीत-जास्त शेअर करा कारण आपल्या एका शेअर एखाद्या घरकुला पासून वंचित व्यक्ती ला लाभ मिळू शकेल.

आपल्याला अजून कोणत्या योजनेविषयी माहिती असेल तर आम्हला comment मध्ये सांगा.आम्ही ती योजना लवकर आपल्यासाठी घेवून येऊ.धन्यवाद……

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाचा लाभास कोण पात्र आहे?

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनासाठी भटक्या जमाती व भटक्या जाती ह्या योजनेसाठी पात्र आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनचे उद्देश काय ?

देश्याच्या स्वातंत्र्यानंतर बरीच वर्ष उलटूनही विमुक्त जाती व भटक्या जमातीचा समाज अध्यापही मुख्य प्रवाहत येऊ शकलेला नाही.या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे त्यामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत ह्या समुदायाला घर बांधून विविध उत्पनाचे स्रोत निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हि योजना राबवत आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

१.सक्षम प्राधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र
२.लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखां पेक्षा जास्त नसावे.
३.भूमिहीन असल्याबाबत सक्षम प्राधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र
४.महाराष्ट्र राज्यातील वास्तव्यबाबतचे अधिवास प्रमाणपत्र
५.कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबत रु-१००/- च्या स्टंप पेपरवर शपथपत्र
६.आधार कार्ड
७.बँक पासबुक
८.मोबाईल क्रमांक हे सर्व कागदपत्रे ह्या योजनेसाठी लागतील अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईट किंवा संबधित ऑफिसशी संपर्क करावा.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाच्या अटी व शर्ती काय?

१.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनामध्ये लाभार्थी कुटुंबाना मिळणारा भूखंड व त्यावरील घर  हे संयुक्तपणे पती व पत्नी यांच्या नावे केली जाईल.२.पण विधवा व परितक्त्या स्रीयांच्या बाबतीत भूखंड व घर त्यांच्याच नवे केली जातील.३.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाअंतर्गत लाभार्थ्यास मिळणारे घर कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीच्या नवे किंवा हस्तांतरित करता येणार नाही.आणि ह्या योजनेतून मिळणारे घर कोणत्याही परिस्थितीत कोणालाही विकत येणार नाही.४.ह्या योजनेच्या लाभ कुटुंबातील एका सदस्याच देय राहील.५.भूखंडावरील जागेचा वापर हा भाडे तत्वावर अन्य व्यक्ती/कुटुंबास देता येणार नाही.तसेच पोट भाडेकरू सुद्धा ठेवता येणार नाही. तसेच विकता हि येणार नाही असे आढळून आले कि सदरचा लाभ हा रद्द करण्यात येईल व मंजूर केलेल्या निधीची वसुली केली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment