शेतकरी ओळखपत्र (Farmer Indentity Card) आपण काढलाय का , शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय व ते कशी मिळवावी हे खालीलप्रमाणे प्रोसेस करा !

शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
- नमस्कार शेतकरी मित्रानो, प्रत्येक योजनेसाठी कागदपत्रे लागतात. पण त्यासोबत आता शेतकरी ओळखपत्र हि लागेल. यामुळे अर्ज योजनेची अर्ज प्रक्रिया सुलभ आणि सोपी होईल. आज आपण आजच्या लेखामध्ये शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय. फायदे व कश्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरून हि काढू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामधून घेणार आहोत
शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
- शेतकरी ओळखपत्र (Farmer Identity Card) हे सरकारकडून अधिकृतपणे दिले जाणारे ओळखपत्र आहे, जे केवळ पात्र शेतकऱ्यांनाच दिले जाते. या कार्डामध्ये शेतकऱ्याचे नाव, पत्ता, भूधारणा तपशील, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती अशा महत्त्वाच्या गोष्टी नमूद असतात.
- हे ओळखपत्र शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना, अनुदाने, विमा योजना, पीक कर्ज व सवलती मिळवण्यासाठी उपयोगी पडते.
शेतकरी ओळखपत्राचे फायदे:
- सरकारी योजनांचा लाभ मिळवताना ओळख सिद्ध
- PM-KISAN, पीएम फसल विमा योजना, कृषी यंत्र अनुदान यांसारख्या योजनांसाठी पात्रता
- पीककर्ज मिळवताना प्राथमिक कागदपत्र म्हणून उपयोग
- गावपातळीवरील महसूल खात्याकडील कामे अधिक सोपी होतात
शेतकरी ओळखपत्र कसे मिळवावे?
शेकरी ओळखपत्र (डाउनलोड) | क्लिक करा |
ऑनलाइन प्रक्रिया:
- https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus या संकेतस्थळावर जा.
- त्यानंतर आपण आपला आधार कार्ड क्रमांक टाका.
- जर तुम्ही अगोदर शेतकरी ओळखपत्रासाठी जर नोंदणी केली असेल तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमची नोदणी माहिती व युनिक फार्मर आयडी स्क्रीनवर दिसते,
- पुढे जाणून स्क्रीनवर दिसणाऱ्या view details पर्यावर क्लिक करा. तुमची संपूर्ण माहिती समोर दिसेल.
- वरच्या बाजूस Generate Pdf किंवा Download pdf हा पर्याय दिसेल
- त्यावर क्लीक्क्रून तुमचा फार्मर आयडी pdf स्वरूपात डाउनलोड करून save करा