मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना मराठी २०२४ | Maza Ladka Bhau Yojana Apply Online Application|मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजंना
मित्रानो आपण जर बघितले तर काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने एक महत्वाची योजना सुरु केली होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना.त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थात माझा लाडका भाऊ योजना ची घोषणा करण्यात आली आहे.तर आपण ह्या पोस्टमध्ये आपण मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना मराठी २०२४ | Maza Ladka Bhau Yojana Apply Online Application योजनाबदल जाणून घेणार आहोत.यासाठी पात्रता काय?कोणते कागदपत्रे लागणार याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.
प्रस्तावना:
मित्रानो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी अनेक युवक आपले शिक्षण पूर्ण करून नौकरी, व्यवसाय च्या शोधात बाहेर पडत असतात.अश्या बहुतांश युवकांना व्यवसाय व नौकरी संबधित अनुभव नसल्याने व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा नोकरी प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते.अश्या अनेक समस्यामुळे युवकांना हवा तसा रोजगार किंवा नोकरी मिळत नाही.मग ते निराश होत असतात व तणाव ओढून घेत असतात.युवक वर्गामध्ये बेरोजगारी प्रमाण नियत्रण ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत.विशेष करून यामध्ये १२ वी पास, विविध ट्रेड मधील आय.टी.आय.,पदविकाधारक, पदवी आणि पदव्युतर युवकांचा समावेश आहे.सद्यास्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवा अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजंना |
सुरुवात | कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र शासन |
उद्देश | युवकांना प्रशिक्षण सोबत दरमहा विद्यावेतन देणे |
लाभार्थी | १२ वी पास, आय.टी.आय / पदविका, पदवीधर /पदव्युतर |
लाभ | दरमहा ६ हजार ते १० हजार विद्यावेतन |
प्रशिक्षण कालावधी | ६ महिने |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://rojgar.mahaswayam.gov.in |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी येथे क्लिक करा!
शासन निर्णय:
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनाचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा!
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नौकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४-२०२५ वर्षापासून राबवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तप्रमाणे खालीलप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल.
अ.क्र. | शैक्षणिक पात्रता | दरमहा विद्यावेतन |
१. | १२ वी पास | रु.६,०००/- |
२. | आय.टी.आय/पदविका | रु.८.०००/- |
3. | पदवीधर/पदव्युतर | रु.१०,०००/- |
१.या योजनेंतर्गत नमूद केलेले दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्याना देण्यात येईल.प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्याची दैनिक हजेरी संबधित आस्थापना / उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
२.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभ हा थेट प्रशिक्षणार्थी च्या बँक खात्यामध्ये दरमहा वितरीत केला जाईल.
३. प्रशिक्षणार्थी हा महिन्यातून १० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस अनुउपस्थित असला तर अश्या प्रशिक्षणार्थी विद्यावेतन हे मिळणार नाही.
४.प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्या महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतन लाभास पात्र राहणार नाही.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना मराठी २०२४ | Maza Ladka Bhau Yojana Apply Online Application|
महाज्योती संस्थामार्फत विद्यार्थ्यांना मिळणार मोफत Tab आणि दरदिवशी ६ Gb इंटरनेट फ्री यासाठी येथे क्लिक करा!
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजंना पात्रता
१.अर्जदाराचे वय कमीत-कमी १८ व जास्तीत-जास्त ३५ वर्ष असावे.
२.उमेदवार किमान १२वि पास, आयटीआय, पदविका, पदवी पदव्युतर असला पाहिजे.
३.अर्जदाराचे शिक्षण चालू असेल तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजंनामध्ये सहभागास पात्र असणार नाही.
४.अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
५.उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
६.अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी सलग्न असावे.
७.अर्जदार कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजंना स्वरूप:
१.उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष या वयोगटातील असावे.
२.उमेदवारांना प्रशिक्षण सुरु असताना १२ वी पास असलेल्या विद्यार्थ्यांना रु.६००० रु.आय.टी.आय व पदविका उत्तीर्ण रु ८०००.पदवीधर आणि पदव्युतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रु.१०,००० दरमहा विद्यावेतन हे प्रशिक्षण सुरु असताना दिले जाईल.
३.प्रशिक्षण कालावधी हा ६ महिनाचा असेल.
४.शासकीय, निमशासकीय कार्यलये महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनि आवश्यक मुनुष्यबळ मागणी ऑनलाईन नोंदवणे गरजेचे आहे.
५.उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणे,
६.प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी उपलब्ध होणार आहे.
७.प्रत्येक ग्रामपंचायत १ व शहरी भागात पाच हजार लोकसंख्यासाठी १ असे एकूण ५० हजार योजनादूत नेमणार
८.ज्यांना अर्ज करायचा आहे अश्या इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
Maza Ladaka Bhau Yojana Document
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजंनासाठी आवश्यक कागदपत्रे:
१.आधार कार्ड
२.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स
३.१२वि पास मार्कशीट/पदवीधर/पदव्युतर आणि आय.टी.आय मार्कशीट
४.पासपोर्ट फोटो
५.मोबाईल नंबर
६.ऑनलाईन अर्ज
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपल्या मराठी वेबसाईटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.तर आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजंनाबदल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त केला.तरी आपले काहि प्रश्न असतील तर आम्हाला comment च्या माध्यमातून विचारू शकता.आम्ही लवकरच आपल्या प्रश्न किंवा शंकाचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू.धन्यवाद मित्रानो.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजंनासाठी आवश्यक कागदपत्रे?
१.आधार कार्ड
२.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स
३.१२वि पास मार्कशीट/पदवीधर/पदव्युतर आणि आय.टी.आय मार्कशीट
४.पासपोर्ट फोटो
५.मोबाईल नंबर
६.ऑनलाईन अर्ज
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजंनासाठी पात्रता काय?
१.अर्जदाराचे वय १८ ते ३५ वयोगटातील असावे.
२.उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
३.बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असावे.
४.आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
५.अर्जदार हा शिक्षण घेत नसावा,
६.अर्जदार हा १०वि, आय.टी.आय आणि पदवीधर व पदव्युतर असावा,
वरीलप्रमाणे माझा लाडका भाऊ योजनाची पात्रता आहेत.
माझा लाडका भाऊ योजनेसाठी लाभ कसा मिळेल?
उमेदवाराला ६ महिन्याचे प्रशिक्षण आणि दरमहा रु.६,००० ते रु.१०,००० विद्यावेतन मिळेल.विद्यावेतन हे शैक्षणिक पात्रता नुसार देय राहणार आहे.
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनासाठी अर्ज कुठे करायचा आहे?
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
https://rojgar.mahaswayam.gov.in/ वेबसाईटवर जा आणि सर्व माहिती वाचून अर्ज हा भरा.